आजच्या डिजिटल युगात अनेक जॉब ऑफर्स ईमेल, मेसेज, किंवा सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत येतात. काही ऑफर्स आकर्षक वाटतात, तर काही संशयास्पद वाटू शकतात. पण खरी ऑफर आणि फसवणूक यामधील फरक कसा ओळखायचा? चला जाणून घेऊया!
१. कंपनीचा तपशील तपासा
ऑफिसियल वेबसाइट: कंपनीची अधिकृत वेबसाइट आहे का हे तपासा. ती प्रोफेशनल दिसते का, त्यावर आवश्यक माहिती आहे का?
कंपनी रजिस्ट्रेशन: MCA (Ministry of Corporate Affairs) च्या वेबसाइटवर कंपनी रजिस्टर आहे का हे बघा.
सोशल मीडिया उपस्थिती: विश्वासार्ह कंपन्या LinkedIn, Facebook, आणि Instagram यासारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात.
२. ईमेल आयडी आणि डोमेन नेम तपासा
• खऱ्या कंपन्या सहसा @companyname.com यासारखे डोमेन वापरतात.
• Gmail, Yahoo किंवा Outlook सारख्या फ्री ईमेल सर्व्हिसेसद्वारे पाठवलेली ऑफर संशयास्पद असते.
• स्पेलिंग मिस्टेक्स किंवा असंबंधित ईमेल आयडी हे देखील फसवणुकीचे लक्षण असते.
३. जॉब ऑफर अतिशय आकर्षक वाटतेय का?
• कमी पात्रतेवर जास्त पगाराची ऑफर, काम न करता मिळणारा पगार किंवा भरघोस बोनस यांसारख्या गोष्टींना त्वरित सावध व्हा.
• "No Experience Required" आणि "High Salary" अशा टर्म्ससह आलेल्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका.
४. पैसे मागणारी ऑफर
• कोणतीही विश्वासार्ह कंपनी तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी पैसे मागत नाही.
• रजिस्ट्रेशन फी, प्रोसेसिंग चार्जेस किंवा ट्रेनिंग फी यासारखे पैसे मागितले जात असल्यास ती ऑफर फसवी असू शकते.
५. थेट इंटरव्ह्यूऐवजी चॅटवर ऑफर
• काही फसवणूक करणाऱ्या कंपन्या फक्त WhatsApp किंवा Telegram वरून इंटरव्ह्यू घेतात आणि लगेच ऑफर लेटर देतात.
• विश्वासार्ह कंपन्या सहसा ईमेल किंवा अधिकृत पोर्टलद्वारे इंटरव्ह्यूची प्रक्रिया करतात.
६. ऑफर लेटरवर लक्ष द्या
• कंपनीचे लोगो, सही, आणि अधिकृत स्टँप असल्याची खात्री करा.
• स्पेलिंग मिस्टेक्स किंवा अयोग्य ग्रॅमर हे देखील बनावट ऑफरचे लक्षण असते.
७. गुगल रिव्ह्यूज आणि फीडबॅक
• कंपनीबद्दलच्या Google Reviews आणि Glassdoor सारख्या वेबसाइट्सवरील फीडबॅक वाचा.
• जर कंपनीची रेटिंग कमी असेल किंवा अनेक लोकांनी ती फसवणूक असल्याचे सांगितले असेल, तर सावध राहा.
८. अनावश्यक वैयक्तिक माहितीची मागणी
• आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स किंवा OTP मागणाऱ्या ऑफर्सना उत्तर देऊ नका.
• फसवणूक करणारे तुमची माहितीचा गैरवापर करू शकतात.
शेवटी एक सल्ला
जॉब ऑफर कितीही आकर्षक वाटली तरी घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. वरील टिप्सच्या मदतीने तिची पडताळणी करा. सत्यता निश्चित झाल्यानंतरच पुढे जा.
तुमच्या पुढील करिअरसाठी शुभेच्छा!
जर हा ब्लॉग तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि फसवणुकीपासून सुरक्षित राहा.
जर तुम्ही अजून जॉब च्या शोधत आहात आणि तुमच्या कडे खालील पैकी कोणतेही स्किल असेल तर आत्ताच या प्लॅटफॉर्म ला भेट द्या.
Fiverr freelancing platform मध्ये कशी नोंदणी करावी? कमाई कशी सुरु करावी
Fiverr वर जॉब मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्सची आवश्यकता असते. तुमच्या आवडी आणि क्षमतांनुसार तुम्ही योग्य स्किल्स निवडून त्यावर काम करू शकता. खाली काही लोकप्रिय स्किल्स दिलेल्या आहेत:
1. ग्राफिक आणि डिझाइन
लोगो डिझाइन
बॅनर आणि पोस्टर डिझाइन
सोशल मीडिया ग्राफिक्स
UX/UI डिझाइन
वेब डिझाइन
प्रॉडक्ट पॅकेजिंग डिझाइन
फोटो एडिटिंग आणि रिटचिंग
2. डिजिटल मार्केटिंग
सोशल मीडिया मॅनेजमेंट
कंटेंट मार्केटिंग
SEO (Search Engine Optimization)
ईमेल मार्केटिंग
फेसबुक आणि गूगल ऍड्स
व्हिडिओ मार्केटिंग
3. रायटिंग आणि ट्रान्सलेशन
ब्लॉग आणि आर्टिकल रायटिंग
कॉपीरायटिंग
टेक्निकल रायटिंग
ट्रान्सलेशन (भाषांतर)
प्रूफरीडिंग आणि एडिटिंग
4. व्हिडिओ आणि अॅनिमेशन
व्हिडिओ एडिटिंग
2D / 3D अॅनिमेशन
व्हॉईस ओव्हर
मोशन ग्राफिक्स
व्हिडिओ मार्केटिंग
5. प्रोग्रामिंग आणि टेक्नोलॉजी
वेब डेव्हलपमेंट
अँड्रॉइड आणि iOS अॅप डेव्हलपमेंट
वर्डप्रेस डेव्हलपमेंट
UI/UX डेव्हलपमेंट
Shopify आणि WooCommerce डेव्हलपमेंट
गेम डेव्हलपमेंट
6. म्युझिक आणि ऑडिओ
म्युझिक कंपोझिंग
ऑडिओ एडिटिंग
व्हॉईस ओव्हर
पॉडकास्ट एडिटिंग
7. बिझनेस आणि लाइफस्टाइल
बिझनेस प्लॅन रायटिंग
मार्केट रिसर्च
फिनान्शियल कन्सल्टिंग
फिटनेस आणि न्यूट्रिशन कोचिंग
मेंटोरिंग आणि कोचिंग
Fiverr freelancing platform मध्ये कशी नोंदणी करावी? कमाई कशी सुरु करावी
Fiverr वरती असणाऱ्या सर्व्हिस चे प्रमोशन करुन सुद्धा तुम्ही तुमच्या कमाई मध्ये भर टाकू शकता त्यासाठी fiverr affiliate program join करा.


