आजकाल B.A (Bachelor of Arts) केल्यानंतर अनेक तरुण-तरुणींना वाटतं की आता त्यांच्या करिअरच्या बाबतीत काहीच होणार नाही. कारण समाजात अजूनही हीच धारणा आहे की B.A म्हणजे मर्यादित संधी. पण ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे. खरं पाहता B.A ही केवळ एक डिग्री नसून तुमच्या भविष्यासाठी खूप सारे मार्ग उघडणारी किल्ली आहे.

B.A म्हणजे कमी संधी नव्हे, तर अनेक पर्याय!

B.A करणारे बहुतेक विद्यार्थी इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा शाखांमधून शिक्षण घेतात. या शाखांमधून त्यांना संवाद कौशल्य, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि संशोधन कौशल्ये मिळतात. या कौशल्यांचा उपयोग करून तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता.

B.A नंतर कोणकोणते करिअर पर्याय आहेत?

1. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकऱ्या

MPSC, UPSC, रेल्वे, बँक परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी B.A उत्तम पर्याय आहे.

राज्यशास्त्र, इतिहास किंवा अर्थशास्त्र शिकलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये विशेष फायदा होतो.

2. लेखन आणि कंटेंट रायटिंग

जर तुमचं लेखन चांगलं असेल, तर तुम्ही ब्लॉगर, कंटेंट रायटर किंवा फ्रीलान्स लेखक म्हणून काम करू शकता.

डिजिटल माध्यमांमध्ये लेखनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

3. ग्राफिक डिझाईन आणि डिजिटल मार्केटिंग

B.A नंतर डिजिटल मार्केटिंग किंवा ग्राफिक डिझाईन शिकून तुम्ही फ्रीलान्स प्रोजेक्ट्स घेऊ शकता.

आजकाल Fiverr, Upwork यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अशा सेवा देणाऱ्यांना खूप मागणी आहे.

Fiverr freelancing platform मध्ये कशी नोंदणी करावी? कमाई कशी सुरु करावी

4. शिक्षण क्षेत्र

तुम्ही B.Ed. करून शिक्षक बनू शकता. तसेच, स्पोकन इंग्लिश ट्रेनर किंवा होम ट्यूटर म्हणूनही करिअर करू शकता.

5. व्यवसाय आणि उद्योजकता

तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही होममेड प्रॉडक्ट्स बनवून विक्री करू शकता किंवा ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकता.

सोशल मीडियाचा उपयोग करून प्रॉडक्ट्सची प्रमोशन करणेही सोपे झाले आहे.

स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला!

B.A ही डिग्री तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेला वाढवते. समाजातील वेगवेगळ्या पैलूंची समज वाढवते. त्यामुळे कोणतंही क्षेत्र निवडायचं असेल, तर त्यामध्ये तुम्हाला नेहमीच एक वेगळा दृष्टिकोन मिळतो.

जर तुम्हाला वाटत असेल की आता पुढे काय करायचं, तर आधी स्वतःला ओळखा. तुमच्या आवडी आणि कौशल्यांचा शोध घ्या. त्यानुसार योग्य स्किल्स शिका आणि आत्मविश्वासाने पुढे चला.

“B.A केल्यानंतर काहीच करु शकत नाही” हा एक गैरसमज आहे. तुमच्यातील क्षमतांना ओळखा, मेहनत करा आणि यशस्वी व्हा!”

Upwork वरती काम कसे सुरु करावे?Upwork द्वारा किती कमाई होते?


मोबाईलवरून घरबसल्या काम करण्यासाठी काही खात्रीशीर वेबसाईट 👇🏻

EarnKaro Affiliate Marketing:

EarnKaro ही भारतातील लोकप्रिय अॅफिलिएट मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही इथे Amazon, Flipkart, Myntra सारख्या ई-कॉमर्स साइट्सचे प्रॉडक्ट्स प्रमोट करून कमिशन कमवू शकता.

कसे काम सुरु करायचे!

1. Earnkaro अ‍ॅप डाऊनलोड करा.

2. प्रॉडक्टची लिंक जनरेट करा.

3. ती लिंक तुमच्या मित्रमंडळी, सोशल मीडिया किंवा ब्लॉगवर शेअर करा.

4. कोणीही तुमच्या लिंकवरून खरेदी केल्यास तुम्हाला कमिशन मिळेल.

यासाठी कोणतीही गुंतवणूक लागत नाही.

Earnkaro affiliate marketing  सुरू करून आजच ऑनलाईन कमवायला सुरुवात करा!

JOIN NOW